महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी योग्य; राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर - राज्य सेवा पुर्व परीक्षा

राज्य सेवा पुर्व परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. या विरोधात आज राज्यभरात लाखो विद्यार्थी आक्रमक झाले असताच, या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यमंत्री बच्चू कडू पुढे आले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी रास्त असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

demands of students appearing for competitive examinations
राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

By

Published : Mar 11, 2021, 8:04 PM IST

Updated : Mar 12, 2021, 3:23 PM IST

अमरावती - राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पुर्व परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. या विरोधात आज राज्यभरात लाखो विद्यार्थी आक्रमक झाले असताच, या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यमंत्री बच्चू कडू पुढे आले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी रास्त असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान या प्रकरणी आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधला असून आता मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्यासोबतच संवाद साधणार असल्याचं बच्चू कडू यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

राज्यातिल विविध परीक्षा केंद्रावर 14 मार्चला राज्य सेवा पुर्व परीक्षा 2020 होणार होती. यासंबधी लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी परीक्षेसंबधी काही सुचना असलेली जाहिरात देखील गुरुवारच्या (ता.11) अंकात प्रसिद्ध देखील केली. मात्र दुपार होता - होता ही परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्याचा अचानक निर्णय आयोगाने घेतला. या निर्णयामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आणि शासकीय सेवेत येण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या आशेवर पाचव्यांदा पाणी फेरल्या गेले. त्यामुळे संतप्त झालेले विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत.

याबाबतची माहिती राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना कळताच त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा देखील केली. मात्र हा तिढा विद्यार्थी हितासाठी सोडविणे आवश्यक असल्याने आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थेट भेटच घेणार असल्याचे बच्चु कडू यांनी सांगितले आसून कुठल्याही परीस्थितीत स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना न्यायच मिळेल असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा - 14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

Last Updated : Mar 12, 2021, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details