अमरावती - बुलडाणा जिल्ह्यातील एका गावातील 16 वर्षीय तरुणीच्या हत्येची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. अमरावतीच्या दर्यापूर येथील तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील सर्वच पक्ष, संघटना सहभागी झाल्या.
बुलडाण्यातील तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी
बुलडाणा जिल्ह्यातील एका गावातील 16 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून फाशी देण्याच्या मागणीसाठी दर्यापूर येथे मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा -केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार
बुलडाणा जिल्ह्यातील एका गावातील 16 वर्षीय तरुणी ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली असता ती घरीच परतली नाही. त्यानंतर तिचा मृतदेह हा मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूर शहराजवळील एका जंगलात आढळला होता. त्यामुळे तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याप्रकरणी तरुणीच्या मारेकरी आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी अमरावतीच्या दर्यापूर येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील सर्वच पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी मृत तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
TAGGED:
agitation at amaravati