महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 21, 2023, 5:12 PM IST

ETV Bharat / state

Ram Navmi : रामनवमीला रामफळाचे विशेष महत्त्व; फळाचे सेवन केल्यास होतात 'हे' फायदे

सध्या बाजारपेठेत राम फळाची आवक वाढली आहे. रामनवमीच्या पर्वावर राम फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अमरावती बाजारात मेळघाटसह जिल्ह्याच्या विविध भागातून रामफळ येत आहेत. राम नवमीला श्री रामाच्या मंदिरात हे फळ वाहण्याला महत्त्व आहे. रामनवमीला धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे रामफळ हे आरोग्यवर्धक फळ आहे.

Ramphal
रामफळ

अमरावतीच्या बाजारात रामफळ दाखल झालेले आहे

अमरावती : रामनवमीच्या पूर्वीच रामफळांची आवक सुरू होत असते. अमरावतीच्या बाजारपेठेत मेळघाटातून सर्वाधिक प्रमाणात रामफळ येतात. यासह अमरावती शहरालगत असणाऱ्या शिराळा, शिंगणापूर, तसेच मोर्शी चांदूरबाजार तालुक्यातून रामफळ येतात. सध्या मोसमनुसार रामफळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

रामफळाचे वाढतील दर : कृषी उत्पन्न बाजार समिती फळांचे व्यापारी असणाऱ्या दिलीप वाठ ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, बाजारात सध्या पाच क्विंटल दहा क्विंटल पासून दोन ते पाच टनपर्यंत रामफळाची आवक आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे सध्या दहा रुपयांपासून वीस रुपये किलो या दराने रामफळ बाजारात विकली जात आहेत. मात्र, रामनवमीच्या पर्वावर रामफळाची मागणी प्रचंड वाढते. यामुळे रामनवमी दरम्यान रामफळाचे भाव 200 ते 250 रुपये किलो पर्यंत वाढतात, असे देखील दिलीप वाठ यांनी सांगितले.


रामफळ आहे आरोग्यवर्धक :रामनवमीच्या पर्वावर रामफळ हे बाजारात आढळतात. राम नवमीला श्री रामाच्या मंदिरात हे फळ वाहण्याला महत्त्व आहे. रामनवमीला धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे रामफळ हे आरोग्यवर्धक फळ आहे. विटामिन ए आणि विटामिन बी या फळांमध्ये आहे दाह, पित्त, थकवा यासाठी राम फळाचा गर अतिशय उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणारे रामफळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

रामफळाचा केला जातो उपयोग :सिताफळ जात कुळीचे असणारे राम फळ हे वर्षातून केवळ 40 ते 50 दिवस बाजारपेठेत उपलब्ध असतात. राम फळाचा गर अतिशय गोड आणि पोट भरण्यासारखा असतो. आईस्क्रीममध्ये देखील रामफळाच्या घराचा उपयोग केला जातो. साधारण फेब्रुवारी चा शेवटचा आठवडा ते मार्च दरम्यान हे फळ खाण्यासाठी उपलब्ध होते फेब्रुवारी ते मार्च ही उन्हाळ्याची सुरुवात असल्याने हा काळ अनेकांसाठी तसा त्रासदायक ठरतो. मात्र, रामफळ हे शरीर व बदलत्या वातावरणाचे संतुलन ठेवून शरीराला पोषकता निर्माण करते.

शेतकऱ्यांचाच प्रतिसाद नाही : अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह मोर्शी चांदूरबाजार अचलपूर अंजनगाव सुर्जी तालुक्यात सिंचन क्षेत्रातील शिवाराच्या बांधावर रामफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. राम फळाला प्रचंड बाजारपेठ उपलब्ध असली तरी जिल्ह्यातील शेतकरी मात्र रामफळाच्या उत्पादनाला विशेष असा प्रतिसाद देत नाही.

राम फळाला स्पर्धा नाही : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सिताफळ आणि संत्री बाजारात येतात तर एप्रिलनंतर आंबा आणि फेब्रुवारी मार्चमध्ये रामफळ येतात. रामफळ बाजारपेठेत ज्या काळात येतात. त्यावेळी रामफळाला इतर कोणत्याही फळाची स्पर्धा करावी लागत नाही. यामुळे राम फळाला चांगला भाव मिळतो. रामफळाच्या झाडाला वर्षाला 200 ते 250 फळे लागतात.

हेही वाचा : Eating almonds before meals : जेवणापूर्वी बदाम खाल्ल्याने प्रीडायबेटिसच्या रूग्णांमध्ये वाढू शकते रक्तातील साखर

ABOUT THE AUTHOR

...view details