महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्ली हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित? उमर खालिद ने दिला होता अमरावतीत इशारा - umar khalid amravati latest news

17 फेब्रुवारीला उमर खालीद शहरात आला होता. येथील चांदनी चौक परिसरात रात्री त्याने जाहीर सभेला संबोधित केले होते. यावेळी त्याने डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्यावर, आम्ही रस्त्यावर उतरून भारत सरकार महात्मा गांधींच्या शिकवणीला पायदळी उडत आहे आणि देश विभाजित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे जगाला दाखवून देऊ, असा इशारा नेता उमर खालिद याने अमरावतीत दिला होता.

उमर खालिद
उमर खालिद

By

Published : Mar 2, 2020, 5:24 PM IST

अमरावती - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात येतील त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरून भारत सरकार महात्मा गांधींच्या शिकवणीला पायदळी उडत आहे आणि देश विभाजित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे जगाला दाखवून देऊ, असा इशारा नेता उमर खालिद याने अमरावतीत दिला होता. उमर खालिदच्या अशा खळबळजनक वक्तव्यानंतर दिल्लीत 42 जणांचा बळी घेणारा हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते.

उमर खालिद

17 फेब्रुवारीला उमर खालीद शहरात आला होता. येथील चांदनी चौक परिसरात रात्री त्याने जाहीर सभेला संबोधित केले होते.

हेही वाचा -'आम्ही सरकारला सांगू .. सीएए, एनपीआर, कायद्याविरोधात ठराव करा'

काय म्हणाला होता उमर खालिद?

70 वर्षात जे झाले नाही ते मी करून दाखवले असे नरेंद्र मोदी भाषणात सांगतात. दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांचा प्रचार करण्यासाठी मोदी परदेशात जातात. भारताची कोणीही काळजी करू नये, भारतात सर्व काही चांगला आहे, असे नरेंद्र मोदींनी परदेशात भाषण करताना म्हणतात. आता मोदींचे मित्र असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येत आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील झोपडपट्ट्या लपवण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी चीन आणि जपान यांच्याशी तुलना केली जात असणाऱ्या गुजरातची अवस्था इतकी बेकार आहे की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा गुजरातच्या परिस्थितीबाबत लाज वाटते. त्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प येत असल्याने सर्व झोपड्या झाकून ठेवत आहेत.

आम्ही वचन देतो की, 24 तारखेला डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात येतील तेव्हा आम्ही दाखवून देऊ की भारत सरकार आणि भारताचे पंतप्रधान हे देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सरकारने महात्मा गांधींच्या विचारांनाही पायदळी तुडविले आहे. भारतातील जनता ही शासनकर्त्यांविरुद्ध लढत असल्याचे आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवून देऊ. सत्ताधीश देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत असले तरी आम्ही सर्व जनता रस्त्यावर उतरून आम्ही एकत्र आहोत, यासाठी मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरेल असेही उमर खालीद याने म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details