महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तू जगातील सर्वात चांगला नवरा; दिपाली चव्हाण यांचं आत्महत्यापूर्वी पतीला भावनिक पत्र

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी आत्महत्या केली. राहत्या घरी गोळ्या झाडून त्यांनी आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या पतीला एक पत्र लिहिले होते. ते पत्र आता 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागले आहे.

दिपाली चव्हाण यांचं आत्महत्यापूर्वी पतीला भावनिक पत्र
दिपाली चव्हाण यांचं आत्महत्यापूर्वी पतीला भावनिक पत्र

By

Published : Mar 27, 2021, 7:49 PM IST

अमरावती -मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी आत्महत्या केली. राहत्या घरी गोळ्या झाडून त्यांनी आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या पतीला एक पत्र लिहिले होते. ते पत्र आता 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागले आहे.

काय म्हणाल्या आहेत दिपाली चव्हाण या पत्रामध्ये

प्रिय नवरोबा...

लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे.

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेली आहे, खरंच भरून गेली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात.

मी खूप सहन केलं पण आता माझी लिमिट खरच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं मी तुझी वाट पाहत होते घरी यायची. आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस माझ्यावर खूप प्रेम करतोस. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचा त्रास देनं कमी झालं नाही.

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वश्री जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे.

आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्ड डिक्स फुटत आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे, मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार माझा डीसीएफ शिवकुमार हा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details