अमरावती -जिल्ह्यातील सोनगाव येथील एका १५ वर्षीय युवकाचा सोनगाव शिवनी तलावात बुडून, मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय सुनील वनवे (वय १५) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
तलावात बुडून १५ वर्षाच्या युवकाचा मृत्यू - swimming pool amrawati
अमरावती येथील विशेष पथकाने अजयचा रात्री उशिरा मृतदेह तलावातून बाहेर काढला.
चांदूररेल्वे तालुक्यातील सोनगाव येथील अजय सुनील वनवे हा युवक, मित्रासोबत सोनगाव जवळील शिवनी तलावावर पोहण्यासाठी गेला होता. मित्र आपले पोहणे झाल्यानंतर घरी परतला. मात्र, अंधार झाला तरी, अजय घरी न आल्याने त्याच्या कुटुंबाने अजयचा शोध घेतला. दरम्यान, तो पोहण्यासाठी गेला त्या तलावाच्या काठावर अजयचे कपडे, चप्पल, बादली हे साहित्य दिसून आहे. त्यानंतर या घटनेची माहिती चांदूररेल्वे पोलीस स्टेशनला दिली. दरम्यान, अमरावती येथील विशेष पथकाने अजयचा रात्री उशिरा मृतदेह तलावातून बाहेर काढला.
हेही वाचा -वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांची समुद्रात गस्त