अमरावती - येथे एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात कार्यरत असलेल्या वार्डबॉयवरच हल्ला करून रुग्णालयातही तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार काल(मंगळवार) रात्री अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात समोर आला आहे. त्यामुळेच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावतीत कोरोनाबाधिताचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा वार्डबॉयवर हल्ला, रुग्णालयात तोडफोड - कोविड सुपर स्पेशालिटी रुग्णालय अमरावती बातमी
अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट या कोविड रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात कार्यरत असलेल्या वार्डबॉयवरच हल्ला करून रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट या कोविड रुग्णालयात काल रात्री दहा वाजताच्या सुमारास एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक तेथे आले व त्यांनी वॉर्डबॉयला मृतदेह ताब्यात मागितला. परंतु, मृतदेह ताब्यात देण्याचे अधिकार हे आम्हाला नसल्याने आम्ही मृतदेह देणार नसल्याचे वॉर्डबॉय कुशल तायडेने सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी वार्डबायला जबर मारहाण केली. हे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी या रुग्णालयातील एका कार्यालयाची तोडफोड करून संगणकाचीही नासधूस केली. याप्रकरणी वार्ड बॉयच्या तक्रारीवरून सदर मृत रुग्णाच्या नातेवाईकांविरुद्ध गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कुशल तायडे या वॉर्डबॉयवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा -मृतदेह स्मशानभूमीत ठेवून नातेवाईकांची पोलीस स्टेशनमध्ये धाव, वाचा काय आहे घटना