अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानुर नदीच्या पुलाखाली मृत नवजात अर्भक आढळून आले. हे पुरुष जातीचे अर्भक एका कापडाच्या पिशवीत अज्ञात व्यक्तीने ठेवलेले होते.
अमरावती : नदीच्या पुलाखाली आढळले मृत अर्भक - Shahanur river
पुलाखाली अज्ञात व्यक्तीने हिरव्या कापडामध्ये एक नवजात अर्भक नदीपात्राच्या पाण्यात टाकलेले आढळून आले. पोलिसांनी हे मृत अर्भक ताब्यात घेतले आहे. त्या मृत अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

मृत अर्भक
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर व चिंचोली बुद्रुक या दोन गावांमधून शहानुर नदी वाहते. त्या नदीवर एक पूल आहे. त्या पुलाखाली अज्ञात व्यक्तीने हिरव्या कापडामध्ये एक नवजात अर्भक नदीपात्राच्या पाण्यात टाकलेले आढळून आले. पोलिसांनी हे मृत अर्भक ताब्यात घेतले आहे.
नदीच्या पुलाखाली आढळले मृत अर्भक
त्या मृत अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. ते नवजात अर्भक कुणाचे आहे ? ते तिथे का आणि कुणी आणून टाकले, याचा पोलीस तपास करत आहेत.