अमरावती -मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह ( Inter Caste Marriage Case Amravati ) केल्याने चिडलेल्या आईवडीलांनी मुलीला पतीच्या घरून चक्क मारहाण करत फरपटत नेल्याची घटना समोर आली होती. ही घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा ( beating of daughter by parents in Ambada in Morshi taluka ) या गावात घडली होती. ती मुलगी आज (रविवारी) पोलिसांच्या मदतीने पतीच्या घरी परतली आहे. शिवाय मुलीने पोलिसांत ऑन कॅमेरा जबाब ( complaint was withdrawn ) देत संबंधित तक्रार मागे घेतली आहे.
पोलिसांनी नोंदविले ऑन कॅमेरा जबाब :मुलाने आपल्या पत्नीला मारहाण करून या प्रकरणात नेल्याची मोर्शी पोलीस ठाण्यात केली. मात्र गेले तीन दिवसांत पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच शनिवारी रात्री उशिरा संबंधित युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी तिचे ऑन कॅमेरा जबाब नोंदवले. रागाच्या भरात मला आई-वडिलांनी मारहाण केली असेल पण मला आपल्या आईवडिलां विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करायची नाही, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या युवतीच्या पतीचेही जबाब घेतले. यानंतर मोर्शी पोलिसांनी त्या मुलीला मुलाच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.