दर्यापूर(अमरावती) -जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे ते विद्यमान आमदार आहेत. दर्यापूर येथीलच एका छत्रपती संघटनेच्या अध्यक्षांनी, सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसारित करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने अमरावती मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
स्थानिक पत्रकारावर प्रशासनाची कारवाई
आमदार बळवंत वानखडे यांना धमकी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीचे ऑनलाइन प्रसारण करण्यासाठी गेलेल्या, एका स्थानिक पत्रकारावर येथील प्रशासनाने कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच पत्रकाराची बाजू घेण्यासाठी छत्रपती संघटनेचे अध्यक्ष कपिल पडघान यांनी पत्रकाराच्या बाजूस आहेत. त्यांनी आमदार बळवंत वानखडे यांना धमकी या व्हिडिओत दिली आहे. आमदार वानखडेची हुकूमशाही सुरू असल्याची टीका या चित्रफिती मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य सभापती बाळासाहेब किणीकर यांच्या नावाचाही उल्लेख आहे. आक्षेपार्ह असलेली ही व्हिडीओ क्लिप अनेकांच्या व्हाट्सअप वर धुमाकूळ घालत आहे.
हेही वाचा- आदर पुनावाला यांना जीवे मारण्याची धमकी, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी