अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज (सोमवार) त्यांची रॅपीड अँटिजेंन चाचणी केली असता, त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.
अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या दर्यापूर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असणारे बळवंत वानखडे यांना मागील काही दिवसांपासून बरं वाटत नसल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. दरम्यान, आज त्यांची रॅपिड अँटीजन चाचणी घेण्यात आली. आमदारांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील सर्व खासगी कोविड रुग्णालय रुग्णांनी भरली असल्याने बळवंत वनखडे यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना कोरोनाची लागण
जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज (सोमवार) त्यांची रॅपीड अँटिजेंन चाचणी केली असता, त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.
दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना कोरोनाची लागण
अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्खा आज 1 हजार 736 वर पोहोचली असून जिल्ह्यात कोरोनामुळे 50 जण दगावले आहेत.