अमरावती -अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील देवगाव, खोडगाव आणि दहीगाव येथे काल रात्री १० वाजता अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह पाऊस व जोराच्या वादळाने केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मुऱ्हा देवी येथे आलेल्या वादळाने येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे केळीचे पीक उध्वस्त झाल्याने हे केळी उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.
वादळामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान -
जिल्हात मान्सूनचे आगमन झाले आहे. ही आनंदाची बाब असली, वादळीवाऱ्यासह पावसाला सुरवात झाल्याने तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. कारण या मान्सून पूर्व आलेल्या पावसासह प्रंचड वादळ आल्याने तालुक्यातील देवगाव खोडगाव आणि दहीगाव या परिसरात आलेल्या वादळाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे परिस्थिती वाईट असताना वादळामुळे झालेल्या या नुकसानीने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, प्रशासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.
हेही वाचा -अभय बंग हे जगव्यापी समाजसुधारक, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र व्यसनमुक्त - विजय वडेट्टीवार