अमरावती - कोरोनाबाधितांची कमी होत चाललेली संख्या शून्यावर येऊन आणण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करण्याचे आवाहन करत, संचारबंदीत सूट देणारा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केला.
सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सूट -
अमरावतीत संचारबंदीत आणखी सूट, बाजारपेठ 12 तास राहणार खुली - Curfew in Amravati
अमरावती जिल्ह्यात संचारबंदीत सूट देणारा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केला. हा आदेश बुधवार 16 जून रोजी सकाळी 7 पासून लागू राहील. या आदेशानुसार सर्व दैनंदिन व्यवहार, जीवनावश्यक आणि बिगर जीवनावश्यक दुकाने यांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Curfew relief in Amravati
हा आदेश बुधवार 16 जून रोजी सकाळी 7 पासून लागू राहील. या आदेशानुसार सर्व दैनंदिन व्यवहार, जीवनावश्यक आणि बिगर जीवनावश्यक दुकाने यांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेता यांची दुकाने, मॉल्स, पिठाची गिरणी व सर्व प्रकारची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दुध संकलन केंद्र, दुध वितरण व्यवस्था, पाळीव प्राणी यांची खाद्यपदार्थ विक्री दुकाने, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, सर्व प्रकारची बिगर जिवनावश्यक सेवा अंतर्गत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने, सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने, कृषी संबंधित सर्व प्रकारची कामे, बांधकामे, सर्व प्रकारची शासकीय रास्त भाव दुकाने, चष्म्याची दुकाने, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आदी. आता सुरू राहणार आहे.
उपाहारगृहांना रात्री 9 पर्यंत मुभा -
हॉटेल, रेस्टॉरंट व बार, खानावळ, शिवभोजन थाळी नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहील.
बाह्य मैदानी खेळाला परवानगी -
सार्वजनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, मॉर्निंग वाक, सायकलिंग, बाह्य मैदानी खेळ सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहील. आंतर मैदानी खेळ बंद राहतील.
कार्यालयांत संपूर्ण उपस्थिती -
सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना, कार्यालये तसेच शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये शंभर टक्के उपस्थितीसह नियमित सुरु ठेवण्यात यावे. मात्र, खासगी आस्थापना किंवा शासकीय कार्यालये यांनी शक्य झाल्यास झूम ॲप किंवा ऑनलाईन पध्दतीने बैठकींचे आयोजन करावे, असे सूचित करण्यात आले आहे.
शिकवणी वर्गाला 10 विद्यार्थ्यांची बॅच घेता येईल -
कोचिंग क्लासेस, खाजगी शिकवणी वर्ग, खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, ग्रंथालये, वाचनालये, जिम, व्यायामशाळा सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहतील. मात्र, प्रत्येक बॅचमध्ये जास्तीत जास्त दहापर्यंतची संख्या किंवा आसन क्षमतेच्या पन्नास टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती याप्रमाणे तसेच दोन बॅचमध्ये अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्येकवेळी हॉलचे, तसेच संगणक साहित्याचे निर्जतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
सार्वजनिक कार्यक्रमांना 50 उपस्थितांची मुभा -
लग्न समारंभ (आचारी, वाजंत्री, वधू-वरपक्ष यासह), सामाजिक तथा राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलने 50 लोकांच्या उपस्थितीत आयोजित करता येतील. मात्र, असे कार्यक्रम सायंकाळी 5 पूर्वी पार पडावेत. अशा आयोजनाला पूर्वपरवानगी आवश्यक असून, त्यासाठी https://sanvad.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावा. संकेतस्थळावर ‘इव्हेंट परमिशन’बाबत स्वतंत्र टॅब आहे. त्यावर क्लिक करून अर्ज करता येईल व अर्जाची स्थितीही तपासता येईल.
चित्रपटगृहांना 25 टक्क्यांची परवानगी -
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बहुविध चित्रपटगृहे यांच्या आसनक्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीला परवानगी आहे.
शाळा, महाविद्यालयांना अद्याप परवानगी नाही -
कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा- महाविद्यालये सुरु होण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पूर्ण आसन क्षमतेसह वाहतुकीला परवानगी राहील. तथापि, प्रवासी उभे राहून प्रवास करता येणार नाही. मालवाहतूक पूर्णवेळ सुरु राहील. आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक होत असल्यास प्रवासी 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोविड पॉझिटिव्हिटी असलेल्या जिल्ह्यातून येत असेल तर ई-पास आवश्यक आहे.
दक्षतेची पंचसूत्री पाळा -
तिसरी लाट येऊ नये व कोरोना साथ समूळ संपुष्टात यावी, यासाठी कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूकीअंतर्गत मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायजर, लसीकरण व टेस्टिंग व आयसोलेशन या पंचसूत्रीचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून करण्यात आले आहे. कुठलीही लक्षणे दिसत असतील तर चाचणी करुन घ्यावी. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Last Updated : Jun 15, 2021, 5:50 PM IST