अमरावती -देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात अमरावतीतून झाली. गत तीन महिन्यापासून लॉकडाऊन असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही, असे असताना सध्या 15 मेपर्यंत असणाऱ्या संचारबंदीची मर्यादा 22 मेपर्यंत म्हणजे आणखी सात दिवस वाढवण्यात आली आहे. एकूणच इतका काळ जिल्हा बंद असताना कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात का येत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - अमरावतीत कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिस आजाराचा शिरकाव; एका महिलेचा मृत्यू
पुन्हा आठवडाभर बंद -
जिल्ह्यात रोज हजाराच्यावर नवे कोरोनाबाधिक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे प्रशासनाने 16 ते 22 मेपर्यंत संचारबंदीचे नवे आदेश काढले आहेत. या काळात खासगी आणि शासकीय रुग्णालय सेवा सुरू असेल तर बँका, पोस्ट, पथसंस्था सकळी 10 ते 3 या वेळेत सुरू असतील. एमआयडीसीतील उद्योगही सुरू राहणार आहे. चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, केश कर्तनालाय, क्रीडांगणे, उद्यान सेतू केंद्र बंद राहणार आहे. हॉटेल, खानावळीमधून पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू असेल.
सद्यस्थितीत 10 हजार 892 सक्रिय रुग्ण -
शुक्रवारी जिल्ह्यात एकूण 922 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असताना जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 892 वर पोचली आहे. शुक्रवारी कोरोनामुळे 18 जण दगावले असून आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 213 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
हेही वाचा -अमरावती शहरात पेट्रोलची शंभरी पार; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले