महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील सीआरपीएफ जवानाचा श्रीनगरमध्ये मृत्यू - मणिपूर येथील सीआरपीएफ जवानाचा श्रीनगरमध्ये मृत्यू

काल रात्री अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पंजाब उईके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे.

मृत पंजाब उईके
मृत पंजाब उईके

By

Published : Jan 29, 2020, 4:03 PM IST

अमरावती - वरुड तालुक्यातील मणिपूर येथील सीआरपीएफ जवनाचे श्रीनगर येथे आज(29 जानेवारी) सकाळी कर्तव्यावर असताना निधन झाले आहे. रक्तदाब कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पंजाब जनुजी उईके (वय 42), असे मृत जवानाचे नाव आहे.

काल रात्री अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पंजाब उईके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटूंबासह गावावर शोकळळा पसरली आहे. पंजाब उईके यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details