अमरावती -सातपुडा पर्वत रांगेत ( Satpuda mountain range ) वसलेल्या मेळघाटचे जंगल पावसामुळे हिरवे गार झाले आहे. मेळघाटात सध्या पर्यटकांची गर्दी प्रचंड ( huge crowd of tourists in Melghat ) वाढली असून शनिवारी आणि रविवारी तर मेळघाटातील मुख्य पर्यटन स्थळी पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती आहे. एकूणच मेळघाटात सध्या निसर्गाच्या ( Nature ) विविध छटांची उधळण होत असताना पर्यटक सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात रममाण होत आहेत.
नद्यांना पूर, डोंगरातून वाहत आहेत धबधबे -मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना, तापी , सापन या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत ( rivers overflowing ). डोंगरावरून वाहत येणाऱ्या या शुद्ध नद्यांच्या पाण्यामध्ये पोहण्याची आंघोळ करण्याची हाऊस अनेक पर्यटक भागवत आहेत. ज्यांना पाण्यात उतरण्याची भीती वाटते असे पर्यटक खळखळ वाहणाऱ्या नदीचे सौंदर्य टिपत त्या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी लगबग करीत आहेत. परतवाडा शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटरच्या आत मेळघाटच्या जंगलात शिरल्याबरोबर वाहनांवरून धबधबे कोसळताना दिसतात. चिखलदरा ( Chikhaldara ) मार्गावर तसेच सेमाडोहकडे ( semadoh ) जाताना अनेक ठिकाणी रस्त्यावरून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असून या धबधब्यांमध्ये आंघोळ करण्याचा आनंद सुद्धा अनेक पर्यटक सध्या जंगलात विविध ठिकाणच्या धबधब्यांवर आढळून येत आहेत.
मेळघाटातील हे ठिकाण आहेत पर्यटकांची आकर्षण -चिखलदरा हे मेळघाटातील पर्यटकांचे सर्वात आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी असणारे देवी पॉईंट ,कीचकदरी, गाविलगड किल्ला यासोबतच आमझरी हे पॉईंट पर्यटकांचे सर्वाधिक आवडते पॉईंट आहे. या सर्वच स्थळांवर सध्या गर्दी पाहायला मिळत आहे शनिवारी आणि रविवारी तर गर्दीमुळे चिखलदऱ्यात वाहन समोर सरकायला देखील अर्धा ते एक तास लागत होता अशी अवस्था आहे. चिखलदरा सोबतच सेमाडोह आणि कोलकास ( Kolkas ) या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. यासोबतच धारखोरा येथील धबधबा पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पोहोचत असून याव्यतिरिक्त मेघाच्या जंगलात असे अनेक ठिकाण आहे ज्या ठिकाणी पर्यटक आनंद लुटत आहेत. धारणी तालुक्या चिखलदरा तालुक्याच्या तुलनेत पर्यटकांची गर्दी कमी दिसत असली तरी या भागात देखील तापी नदीचे ( Tapi River ) भरलेले सौंदर्य पावसाळ्यात पाहण्याची मजा काही औरच असल्यामुळे अनेक पर्यटक हाच तापी नदी पाहायला येतात. यासह गोलाई या मेघाटातील सर्वात उंच ठिकाणी असणाऱ्या मेघाटातील सर्वात सुंदर अशा धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचतात. मेळघाटात सध्या सातपुडा पर्वतरांग धुक्यात बुडालेली पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी रस्ते धुक्यात बुडाले आहे तर उंचावर असणाऱ्या पर्यटकांना खाली संपूर्ण जग धुक्यात बुडाले आहे असे दृश्य पाहायला मिळते.
अशी आहे पर्यटकांना राहण्याची व्यवस्था -मेळघाटात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चिखलदरा सीमाडोह,कोलकास, हरिसाल या ठिकाणी विश्रामगृहासह टेन्ट हाऊस ची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच या भागातील आदिवासींच्या घरामध्ये स्टे होमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी थांबण्यासाठी अमरावती आणि परतवाडा येथून बुकिंग करावं लागतं तसेच वाइल्डलाइफ डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर देखील आपल्या राहण्याचे ठिकाण आरक्षित करण्याची सोय आहे. या शासकीय सुविधांसोबतच चिखलदरा आणि सेमाडोह येथे खाजगी हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था आहे.