अमरावती - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी (दि. 7 मे) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तर अनेक ठिकाणी गारपिटीचा जबर फटका बसला. या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कांदा, आंबा सह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर हे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामातील कांदा आंबा आदी पिकांवर होती. पण, काल (शुक्रवारी) आलेल्या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पुरता नांगर फिरवला आहे.
अमरावती : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी (दि. 7 मे) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तर अनेक ठिकाणी गारपिटीचा जबर फटका बसला. या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कांदा, आंबा सह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशीच परिस्थिती या गावातील शेतमजूर ईबाद मुल्ला यांची आहे. इबाद मुल्ला हे शेतमजूर आहेत. शेत मजुरीवर पाच लोकांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह पूर्णपणे होत नसल्याने कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून आंब्याचा व्यवसाय करतात. ते शेतकऱ्यांकडून काही दिवसांसाठी आंब्याचे झाड खरेदी करतात. त्याची दिवस-रात्र राखण करून त्यातून त्यांना काही रुपयांचा नफा होतो. पण, काल रात्रीच्या वादळी पावसामुळे झाडावरील संपूर्ण आंबा खाली गळून पडल्याने तब्बल 25 ते 30 क्विंटलपेक्षा आंब्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे.
हेही वाचा -दारुवाल्यांचा शरद पवारांना कळवळा येतो पण.. - अनिल बोंडे