अमरावती- शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील वरुड व तिवसा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावातील कपाशी, संत्रा आदी पीक पूर्णपणे जमिनीवर आले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे वरुड तालुक्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
वरूड, तिवसा तालुक्याला पावसाने झोडपले; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान
सध्या सोयाबीन पीक हे सोगण्याच्या मार्गावर असून कपाशीची स्थिती चांगली आहे. तर झाडाला चांगली संत्री लागली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रोज पाऊस येत आहे. त्यामुळे, या पिकांचे नुकसान होत आहे. शनिवारी सायंकाळी तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड, धामत्री या भागात मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, या भागातील शेत पिकांना मोठे नुकसान झाले.
सध्या सोयाबीन पीक हे सोगण्याच्या मार्गावर असून कपाशीची स्थिती चांगली आहे. तर, झाडाला चांगली संत्री लागली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रोज पाऊस येत आहे. त्यामुळे, या पिकांचे नुकसान होत आहे. शनिवारी सायंकाळी तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड, धामत्री, या भागात मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, या भागातील शेत पिकांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी होत आहे.
हेही वाचा-कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कोविड रुग्णालयात नातेवाइकांचा गोंधळ