अमरावती- रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा कंबरेडे मोडले आहे. हातातोंडांशी आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच चांदुर बाजार आणि चिखलदरा तालुक्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ठिक-ठिकाणी झाडे, विजेचे खांब कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात काही काळ बत्ती गुल झाली होती.
अमरावतीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, कांद्याने शेतकऱ्यांना रडवले
एकीकडे कोरोनाचे सावट असतानाच रविवारी वादळी वाऱ्यासह गारपीटीने थैमान घातले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एकीकडे कोरोनाचे सावट असतानाच रविवारी वादळी वाऱ्यासह गारपीटीने थैमान घातले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. आता कांदा काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे या कांद्याचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका हा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना बसला आहे.
दरम्यान, चिखलदरा आणि चांदुर बाजार तालुक्यात गारपीट झाल्याने संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. तबल 3 तास सुरु असलेल्या या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.