"ओम"कार हे विश्व निर्मितीचे प्रतीक; सिंधू संस्कृती अभ्यासक विजय इंगोले यांचं मत अमरावती Creator of Universe : हिंदू धर्मात 'ओम' या मंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओम सत् म्हणजे हेच अंतिम सत्य आहे. हा हिंदू प्रणालीचा एक महत्त्वाचा उपदेश असून वेदातील श्लोक यानेच सुरू होतात. बौद्ध, जैन अशा इतर पद्धती धर्मांमध्ये देखील 'ओम' चा उल्लेख आहे. शीख पंथाच्या ध्वजावर देखील 'ओम' मंत्र बिंबित असून विश्व निर्मितीचे प्रतीक असणाऱ्या ओमकारातूनच गणपतीची देखील उत्पत्ती झाली असल्याचे सिंधू संस्कृतीचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. विजय इंगोले यांचं म्हणणं आहे. 'ओम' या मंत्रासंदर्भात केलेला सखोल अभ्यास आणि संशोधनाबाबत डॉ. विजय इंगोले यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना ही माहिती दिली.
'ओम'कार मधून झाली श्री गणेशाची निर्मिती : श्रीगणेशाची निर्मितीही 'ओम' या चिन्हापासून झाली असून, या चिन्हाचा सखोल अभ्यास केल्यावर यात उजवीकडून डावीकडे वाचतांना o हा सूर्य, U हा चंद्रकोर, तर * हा तारका समान दिसतो. यातील 3 हे योनी सदृश्य असून, ॐ हे संयुक्त प्रतिक आहे. ॐ हे निर्मिती व काळाचा अनोखा संगम असून, हेच विश्व निर्मितीचे द्योतक आहे. 'ओम' या चिन्हाला डावीकडं काटकोनात बघितलं असता श्रीगणेशाचं मुख दिसतं, असं निरीक्षण संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी नोंदवलं.
'ओम' विश्व निर्मितीचं प्रतीक : देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे वाचली जाते. पूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये उजवीकडून डावीकडे वाचण्याची प्रथा होती. सिंधू संस्कृतीनुसार 'ओम' हे चिन्ह उजवीकडून उच्चार केला असता, त्याचा ओमचा ध्वनी निर्माण होतो. डावीकडून वाचल्यास काहीही उद्बोध होत नाही. याला जेंव्हा उजवीकडून वाचन केलं जातं, तेव्हा 'ओम' या चिन्हातील o हा सूर्याचा प्रतीक असून, तो दिवस दर्शवतो, अर्धा U हा चंद्राच्या कोरचे प्रतिक म्हणजेच महिना तर * हा ताऱ्यांचे प्रतीक असून वर्ष काळ दर्शवतात आणि 3 अंकातील मधला पोकळ भाग योनी सदृश्य असून उत्पत्ती (निर्मिती) चे प्रतीक असल्याचीही माहिती डॉ. विजय इंगोले यांनी दिली.
सिंधू संस्कृतीचा वारसा : सर्व पूजा व निर्मिती मध्ये श्री गणेशाला पहिलं स्थान आहे. गणेश मूर्ती प्रवेशद्वारावर विराजमान असते, यावरून पवित्र 'ओम' मंत्राचं श्री गणेश हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जागतिक संशोधकांच्या अभ्यासानुसार, सिंधू संस्कृती हे मानवाच्या उत्तर ,पश्चिम आणि पूर्वेकडील स्थलांतराचे केंद्र होतं. हिंदू धर्माच्या ध्वजांवरून सूर्य, चंद्र, तारे इत्यादी स्वरुपात ते ध्वजावर पूर्णतः अथवा अंशतः स्वरुपात स्वीकारले असावे असंही डॉ. विजय इंगोलेंनी म्हटलंय.
हेही वाचा :
- Ganesh Festival २०२३ : चित्रकारानं पर्यावरण बचाव देखावा साकारत गणरायाला घातलं 'हे' साकडं; पाहा व्हिडिओ
- Silver Ganesha Idol : तब्बल 100 किलो चांदीची गणरायाची मूर्ती; पाहा व्हिडिओ
- Ganeshotsav 2023 Lalbaghcha Raja: लालबागच्या राजाचरणी पहिल्याच दिवशी 'इतकं' दान जमा, पाहा व्हिडिओ