अमरावती - जिल्ह्यात गुरुवारीकोरोना रुग्णांची संख्या दीड हजारांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे गोपाल नगर कॉलनीतली एका सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे अमरावतीत आतापर्यंत 44 जण दगावले आहेत.
अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली दीड हजारांवर - Amravati corona update
गुरुवारी अमरावतीत एकूण 65 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 53 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
गुरुवारी अमरावतीत एकूण 65 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 53 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 1 हजार 550 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 467 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 1 हजार 53 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 30 हजार 690 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 18 हजार 723 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत.
सध्या 349 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत. तसेच छायानगर, वडाळी, नावसरी, द्वारकानाथ कॉलनी, छायानगर, लक्ष्मीनगर, गुरुकृपा कॉलनी, मासानगंज, साबणपूरा, गडगेनगर, सुंदरलाला चौक, साई नगर येथील गावंडे लेआऊट, देशमुख लॉन परिसर, शंकर नगर, गोपाल नगर, राजापेठ, आनंद नगर, अर्जुन नगर, नवाथे चौक, सोनल कॉलनी, नरहरी नगर, कंवरनगर, रहमत पुरा, नवी वस्ती बडनेरा यासह दर्यापूर, चांदूरबाजार तालुक्यातील खरपी गावात कोरोना रुग्ण आढळले. अचलपूर, मोर्शी, चांदूररेल्वे, दर्यापूर या तालुक्यातही कोरोना रुग्ण आढळलेत.