अमरावती- जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय कुस्तीपटूने पत्नीसह चिखलदरा येथील २ हजार फूट खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. १ मे' घडलेल्या या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतरही त्या दाम्पत्याचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आलेले नाहीत. गणेश हेकडे आणि राधा गणेश हेकडे अशी त्या पती पत्नीची नावे आहेत.
चिखलदऱ्यातील दाम्पत्याची आत्महत्या : मधमाशांच्या हल्ल्याने गेल्या ४८ तासांपासून मृतदेह दरीतच - अमरावती
आज नागपूर येथून एनडीआरएफची टीम येणार असून ते मृतदेह बाहेर काढण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे मात्र, आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचा चिमरुडा मुलगा बजरंग आपल्या आईवडिलांना पाहण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहेत.

गणेश आणि राधा हेकडे या दोघांनी एक तारखेला घरगुती वादातून चिखलदारा येथील भीमकुंडात आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच मंगळवार पासून पोलीस व स्थानिक नागरिक मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भीमकुंड दरीचे अंतर वरून सुमारे २ हजार फूट खोल असल्याने मृतदेहापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सात किलोमीटरचे अंतर कापून तिथे पोहोचावे लागले. गुरुवारी तिथे पोहोचलेल्या एका पथकाने ते मृतदेह ताब्यात घेतले मात्र, तेथून ते पठारावर आणण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ५ जण जखमी झाले आहेत, त्यात एक गंभीर आहे. त्यामुळे ती मोहीम स्थगित करावी लागली होती.
आज नागपूर येथून एनडीआरएफची टीम येणार असून ते मृतदेह बाहेर काढण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे मात्र, आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचा चिमरुडा मुलगा बजरंग आपल्या आईवडिलांना पाहण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहेत.