अमरावती- जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांच्या २० जागांसाठी काल निवडणूक पार पडली. आज तीनही पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे.
अमरावतीमधील तीन पंचायत समिती निवडणुकांची आज मतमोजणी - धामणगाव रेल्वे पंचायत समिती
धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे आणि तिवसा, या तीन पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली असून १२ वाजेपर्यंत तीनही पंचायत समित्यांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.
पंचायत समिती
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे आणि तिवसा, या तीन पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. या तीन पंचायत समित्यांच्या २० गणांतून ७६ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली असून १२ वाजेपर्यंत तीनही पंचायत समित्यांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.