महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; नोंदणी न झालेल्या कापूस उत्पादकांना 6 जूनपर्यंत करता येणार नोंदणी - अमरावती कापूस उत्पादक शेतकरी न्यूज

कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. खरेदी आणि नोंदणीतही अडथळे आले आहेत. अनेक शेतकरी शासकीय हमीभाव योजनेंतर्गत नोंदणी करू शकले नाहीत. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी महासंघ व प्रशासनाशी चर्चा करून नोंदणीपासून वंचित शेतकरी बांधवांची तत्काळ नोंदणी करण्याचे निर्देश दिले.

Cotton
कापूस

By

Published : Jun 2, 2020, 9:42 PM IST

अमरावती - खरीप हंगाम तोंडावर आला आहे. असे असूनही पश्चिम विदर्भातील नोंदणी केलेल्या ८६ हजार शेतकऱ्यांचा कापूस हा खरेदी विना घरी पडलेला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी करावी अशी बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या बातमीची दखल घेत अमरावती जिल्ह्यातील कापूस नोंदणीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ३ ते ६ जूनपर्यंत या शेतकऱ्यांना कापसाची नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी न झालेल्या कापूस उत्पादकांना 6 जून पर्यंत करता येणार नोंदणी

कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. खरेदी आणि नोंदणीतही अडथळे आले आहेत. अनेक शेतकरी शासकीय हमीभाव योजनेंतर्गत नोंदणी करू शकले नाहीत. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी महासंघ व प्रशासनाशी चर्चा करून नोंदणीपासून वंचित शेतकरी बांधवांची तत्काळ नोंदणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासन उद्यापासून नऊ ठिकाणी नोंदणी सुरू करणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कापूस खरेदी सुरू करण्याबाबत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याशीही चर्चा करून ठाकूर यांनी अडचणी जाणून घेतल्या.

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी केंद्र निहाय कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अमरावती, भातकुली व तिवस्यासाठी अमरावती, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी धामणगाव रेल्वे, वरूड तालुक्यासाठी वरूड, मोर्शी तालुक्यातील मोर्शी, दर्यापूर तालुक्यासाठी दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी अंजनगाव सुर्जी, अचलपूर व धारणीसाठी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यासाठी चांदूर बाजार येथील बाजार समितीकडे नोंदणी करता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details