अमरावती -तीन महिन्यात हाती येणारे खरिपाचे सोयाबीन पीक यंदा पार हातून निघून गेले, खोडकिडा व परतीच्या पावसाने सोयाबीन माती मोल झाले तर आता सततच्या पावसामुळे कपाशी पिकालाही फटका बसला आहे. अतिपावसामुळे कपाशीचे बोंडे सडली असून कापूस झाडावरच काळा पडला आहे.
अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर कपाशी पीक परतीच्या पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे आता सोयाबीन व कपाशी पीक हातून गेल्यानंतरही केवळ नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाकडून केले जात असून प्रत्यक्षात नुकसान भरपाई केव्हा मिळणार? हा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.