ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार बच्चू कडू यांना अपंगांचा कैवार प्रसिद्धी पुरताच  - गोपाल तिरमारे - opal tirmare

आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी डॉ. नयना कडू यांच्या मालकीचे असणारे कमलापूर येथील निवासी मूकबधिर महाविद्यालयातील गैर प्रकाराची माहिती उघड करण्याच्या उद्देशाने नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी पत्रकार परिषद घेतली.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 11, 2019, 9:32 AM IST

अमरावती - अपंगांच्या नावावर आंदोलन करणारे, वेळप्रसंगी अधिकार्‍यांच्या कानाखाली लगावणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी 2011 ते 2017 पर्यंत अपंगांकरिता मिळणाऱ्या आमदार निधीपैकी एक रुपयाही खर्च केलेला नाही. आमदार बच्चू कडू यांना केवळ प्रसिद्धी पुरताच अपंगांचा कैवार असल्याचा आरोप चांदूरबाजार नगरपरिषदेतील नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी डॉ. नयना कडू यांच्या मालकीचे असणारे कमलापूर येथील निवासी मूकबधिर महाविद्यालयातील गैर प्रकाराची माहिती उघड करण्याच्या उद्देशाने नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. टोंगलाबाद येथील डॉ. नयना कडू यांच्या मालकीच्या निवासी मूकबधिर विद्यालयाच्या शौचालयाचे व इतर बांधकाम नियमबाह्य असून त्यांच्या इतर सहकारी संस्थांवरही थकबाकी आहे. मात्र प्रशासन राजकीय दबावापोटी बच्चू कडूंवर कारवाई करीत नाही, असे गोपाळ तिरमारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- अमरावतीतील चुनाभट्टी परिसरात हाणामारी, नगरसेवकासह दोघे जखमी

आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम सर्वसाधारण अनुज्ञेय कामांच्या यादीमध्ये अंध, अपंग व मतिमंद मुलांकरिता एका आर्थिक वर्षात एकूण दोन कोटी निधीपैकी पंधरा लाखांचा निधी खर्च करण्याची तरतूद आहे. असे असताना 2011 ते 2017 पर्यंत आमदार बच्चू कडू यांनी अपंगांकरिता एक पैसाही खर्च केला नाही, अशी माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाली असल्याचे गोपाल तिरमारे म्हणाले. यावरून जनतेसमोर आपण अपंगाचे कैवारी आहोत, अशी प्रतिमा निर्माण करून केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी स्वार्थी भूमिका घेत असल्याने आमदार बच्चू कडू यांचा आपण निषेध नोंदवित असल्याचेही गोपाल तिरमारे म्हणाले. आमदार बच्चू कडू आणि डॉ. नयना कडू यांच्या संस्थेत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी झाली नाही तर आपण अन्नत्याग आंदोलन करू असा इशाराही गोपाल तिरमारे यांनी दिला.

हेही वाचा- 'जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल 370 हटवल्याचे भयावह परिणाम होऊ शकतात'

ABOUT THE AUTHOR

...view details