महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांना राज्यस्थानमधून आणलं, मध्य प्रदेश-महाराष्ट्र चेक पोस्टवर केली तपासणी - coronavirus lockdown

आज त्या विद्यार्थ्यांना राजस्थानमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून महाराष्ट्रात आणण्यात आले. अमरावती विभागातील 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेस महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाले. तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

coronavirus lockdown : Students trapped in Rajasthan's kota were brought to Maharashtra
विद्यार्थ्यांना राज्यस्थानमधून आणलं, मध्य प्रदेश-महाराष्ट्र चेक पोस्टवर केली तपासणी

By

Published : May 1, 2020, 3:57 PM IST

अमरावती - कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा शहरात शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रमधील विद्यार्थी अडकले. तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राजस्थान सरकारशी बोलणी केली. आज त्या विद्यार्थ्यांना राजस्थानमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून महाराष्ट्रात आणण्यात आले. अमरावती विभागातील 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेस महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाले. तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

उच्च शिक्षणासाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थी, राजस्थानमधील कोटा शहरात जातात. यावर्षी देखील अमरावती विभागातील 200 हून अधिक तर अमरावती जिल्ह्यातील 72 विद्यार्थी हे कोटा येथे शिक्षणासाठी गेले होते. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर केला आणि वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे ते विद्यार्थी कोटा शहरात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांचे पालकांनी त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली. तसेच विद्यार्थ्यांनीसुद्धा आम्हाला घरी परत न्या, अशी विनवणी सरकारकडे केली होती. यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी राजस्थान सरकारशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा केला. तर अमरावती जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला.

राजस्थानच्या कोटामधून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी गेलेले महामंडळाचे कर्मचारी...
दरम्यान, अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांना कोटा येथून परत आणायला गेलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 7 बसेस विद्यार्थ्यांना घेऊन आज महाराष्ट्रमध्ये दाखल झाल्या आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील 72 विद्यार्थी असून उर्वरित विद्यार्थी हे यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा, जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर बस येताच त्या विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता त्यांना त्यांच्या गावी सोडले जाणार असून त्यांना पुढील १४ दिवस होम क्वांरटाईन करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details