अमरावती - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने काही निर्बंध ( gov restrictions on tourist places ) लादले आहेत. यामध्ये राज्यातील अनेक पर्यटनस्थळांवर ही बंदी आणली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पर्यटनस्थळे कोरनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा बंद ( Chikhaldara closed due to corona ) करण्यात आले आहेत. त्याचा फटका विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या चिखलदारा पर्यटन स्थळाला बसत आहे.
चिखलदारा हे ( Vidarbhas Kashmir Chikhaldara ) थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा हे पर्यटनस्थळ मागील दोन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांविना चिखलदारा ( corona impact on Chikhaldara ) पुन्हा एकदा ओस पडले आहे. पर्यटकच चिखलदारामध्ये येत नसल्याने पोट भरावे तरी कसे, असा सवाल येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उपस्थित केला आहे. त्यामुळे पर्यटन सुरू करण्याची मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.
हेही वाचा-Ashish Shelar Reply to Sanjay Raut : प्रमोद महाजनांच्या पायाजवळ पोहचण्याची राऊतांची योग्यता नाही - शेलार
अमरावतीच्या चिखलदारामधील नागरिकांचा व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून असतो. पावसाळा आणि हिवाळा या 8 महिन्यांमध्येच येथे पर्यटन सुरू राहते. सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे पर्यटन सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी, मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे. कोरोनाची लाट आल्याने ज्ञानगंगा, काटेपूर्णा, नरनाळा, सीमाडोह, चिखलदारा व आमझरी वनउद्यान आदी ठिकाणे पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. या ( Employment issue in Chikhaldara ) पर्यटनामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळत असतो. परंतु मात्र आता रोजगार संकटात सापडला आहे.
हेही वाचा-Dry Day in Delhi : दिल्लीत आता फक्त तीनच दिवस ड्राय डे; जाणून घ्या कोणते आहेत 'ते' दिवस
देवी पॉईंटवर शुकशुकाट
चिखलदरा येथील महत्त्वाचा समजला जाणाऱ्या देवी पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य बाईक, घोडा सवारी, उंट सवारी, आकाश पाळणे इत्यादी वस्तू आहे. त्यामुळे हा देवी पॉइंट नेहमी पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात असतो. परंतु आता मात्र या देवी पॉइंटवरही शुकशुकाट पहायला मिळतो. देवी पॉइंट असलेल्या देवीच्या मंदिरातही भाविक येत असतात. त्यामुळे फुले, नारळे व पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानदाराचा व्यवसाय होतो. परंतु आता भाविक येत नसल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा-National Tourism Day 2022 : जगात एकमेव असणारी वेरूळ लेणी घडवते तीन धर्मांचे दर्शन
चिखलदऱ्यातील गाविलगड किल्ला बंद
चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षण असलेला गाविलगड किल्ला मध्यंतरी सुरू झाला होता. परंतु कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर गाविलगड किल्लाही पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. राज्यभरातील पर्यटक हे चिखलदारामध्ये दाखल झाल्यानंतर आवर्जून गाविलगड किल्ल्याला भेट देत असतात. परंतु गाविलगड किल्लाही बंद करण्यात आला आहे. या किल्ल्यावर सर्वात उंच ठिकाणी एक तोफदेखील ठेवण्यात आली आहे.
चिखलदरामधील गार्डनही बंद
चिखलदारा येथील गार्डन मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. लहान बालकांसाठी खेळण्याचे साहित्य या गार्डनमध्ये आहे .परंतु प्रशासनाने गार्डनही बंद केले आहे.
वैराट जंगल सफारी बंद
चिखलदरामधील जंगल सफारीच्या माध्यमातून शेकडो चिखलदरावासियांना रोजगार मिळतो. यामध्ये गाईड्स, जिप्सी चालक व जिप्सी मालक यांना रोजगार मिळत असतो. परंतु प्रशासनाने जंगल सफारीही बंद केली आहे. त्यामुळे जिप्सी खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे? तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम ठरवून पर्यटनाला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे..