महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चांदूर रेल्वेत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 40 जणांची 'आरटीपीसीआर' चाचणी - amravati district news

अमरावती जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, चांदूर रेल्वे शहरात विनाकारण घराबाहेर फिणाऱ्यांची भर चौकात कोरोना चाचणी करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 17, 2021, 5:09 PM IST

Updated : Apr 17, 2021, 5:33 PM IST

अमरावती- जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, चांदूर रेल्वे शहरात विनाकारण घराबाहेर फिणाऱ्यांची भर चौकात कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर काही प्रमाणात गर्दी आटोक्यात आली होती. ही मोहीम तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि. 16 एप्रिल) जुना मोटार स्टँड येथे राबविण्यात आली. यात 40 लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

बोलताना तहसीलदार

अमरावतीतही विनाकारण फिरणाऱ्याची चाचणी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी महानगरपालिकेतर्फेही विनाकारण ‍फिरणाऱ्या नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्‍यात आली. हा उपक्रम राबविण्‍यात आला. कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. हा संसर्ग थांबविण्‍यासाठी व एखाद्या बाधितांकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण ‍फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अ‌ॅन्‍टीजन चाचणी करण्‍याचा उपक्रम महानगरपालिकेने घेतला आहे. या उपक्रमाची गुरुवारपासून शहरात अंमलबजावणी करण्‍यात आली. स्वत: उपआयुक्‍त रवी पवार यांनी रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक यांच्‍या मदतीने विनाकारण ‍फिरणाऱ्यांची अ‌ॅन्टीजन चाचणी केली. राजकमल चौक आणि राजापेठ चौकात विनाकारण ‍फिरणाऱ्यांची शुक्रवारी अ‌ॅन्‍टीजन चाचणी करण्‍यात आली.

हेही वाचा -अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद, प्रवाशांना काढले बाहेर

हेही वाचा -मेळघाटात कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेलेल्या महिलेचा मृत्यू

Last Updated : Apr 17, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details