महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत राज्यसेवा परीक्षेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू - अमरावती कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

येत्या रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, लोकसेवा आयोगाकडून बंधनकारक करण्यात आले आहे.

अमरावती
अमरावती

By

Published : Mar 19, 2021, 3:18 PM IST

अमरावती- राज्य शासनाच्या विविध विभागातील पद भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, लोकसेवा आयोगाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची चाचणी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आली असून गुरुवारपासूनच नियुक्त कर्मचाऱ्यांच्या घशाच्या स्त्रावाचे घेणे सुरू झाले आहे.

अमरावती

राज्यसेवा परीक्षेसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चाचणी केंद्रावर वेळेत येऊन चाचणी करून व वेळीच अहवाल प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी संबंधितांना कोणताही खर्च लागणार नाही. एखाद्या कर्मचार्‍याच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या बदलीत वेळेत पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी ठेवले जाणार आहेत. परीक्षा निकोप वातावरणात पार पडावी यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

हेही वाचा -मनसुख हिरेन हत्या प्रकरण : मुंबई पोलिसांचा हलगर्जीपणा, की षडयंत्र?

अमरावती जिल्ह्यातील एकूण ३६ केंद्रावर ११ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ११०० अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता या ११०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना परीक्षेपूर्वीच कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून आज सकाळीच लांबच-लांब रांगा लागल्याचे दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details