अमरावती - गावातील कोरोनाबाधितांना आणायला गेलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर एका मद्यधुंद कोरोना संशयित रुग्णाने दगडफेक केली. जिल्ह्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या धनोडी मलकापूर गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद संशयित रुग्णावर गुन्हा दाखल केले आहे.
अमरावतीत मद्यधुंद कोरोना संशयित रुग्णाची रुग्णवाहिकेवर दगडफेक - अमरावती कोरोना पॉझिटिव्ह केसेस
जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धनोडी मलकापूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती रुग्णालयाला मिळाल्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन चालक धनोडी मलकापूर येथे गेला. कोरोनाबाधित कुटुंबातील मद्यधुंद तरुणाने रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. यामध्ये रुग्णावाहिकेची काचही फुटली.
जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धनोडी मलकापूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती रुग्णालयाला मिळाल्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन चालक धनोडी मलकापूर येथे गेला. कोरोनाबाधित कुटुंबातील मद्यधुंद तरुणाने रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. यामध्ये रुग्णावाहिकेची काचही फुटली. हा मद्यधुंद तरुण इतक्यावरच थांबला नाहीतर त्याने उपस्थित लोकांना शिवीगाळही केली. दरम्यान, खोलापूर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी सांगितले.