अमरावती- अवघ्या काही तासात जिल्ह्यात १० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. तर, कोरोनामुळे जिल्ह्यात १० जण दगावले आहेत.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ५३ वर; १० जण दगावले - corona amravati
शनिवारी सकाळी ४ जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आल्यावर दुपारी मिळालेल्या नव्या अहवालात आणखी ६ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये गौसनगर परिसरातील २३ वर्षीय पुरुष, ताज नगर येथील ७ वर्षाची मुलगी, ३४ वर्षाची महिला आणि ३२ वर्षाचा पुरुष असे ४ कोरोनाबधित आढळले आहेत.
शनिवारी सकाळी ४ जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आल्यावर दुपारी मिळालेल्या नव्या अहवालात आणखी ६ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये गौसनगर परिसरातील २३ वर्षीय पुरुष, ताज नगर येथील ७ वर्षाची मुलगी, ३४ वर्षाची महिला आणि ३२ वर्षाचा पुरुष असे ४ जण कोरोनाबधित आढळले आहेत. मृतांमध्ये शहरातील छाया नगर परिसरातील ५५ वर्षीय पुरुष आणि चांदूरबाजार तालुक्यातील शिराळा येथील ५० वर्षीय व्यक्ती यांना कोरोना संक्रमण असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १० वर गेली असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-अमरावतीच्या परतवाडा शहरात पोलिसांसोबत आता २५० तरूण रस्त्यावर