अमरावती - बडनेरा नवी वस्ती परिसरातील 50 वर्षीय व्यक्ती आजारी असल्याने त्याला त्याच्या कुटुंबीयांनी एक वेळा सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि एकदा महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. दोन्ही वेळा मात्र त्या व्यक्तीला घरी पाठविण्यात आले असताना आता त्या व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.
डॉक्टरांनी दोन वेळा घरी पाठवलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण - अमरावती कोरोना अपडेट्स
आज बडनेरा नवी वस्ती परिसरातील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोना असल्याचे समोर आल्यावर संपूर्ण बडनेरा परिसरात खळबळ उडाली. गंभीर बाब म्हणजे सादर व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षण असल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितल्यावर त्यास सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले.
आज बडनेरा नवी वस्ती परिसरातील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोना असल्याचे समोर आल्यावर संपूर्ण बडनेरा परिसरात खळबळ उडाली. गंभीर बाब म्हणजे सादर व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षण असल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितल्यावर त्यास सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांचा स्वॅब न घेता त्यांना घरी परत पाठविण्यात आले होते. त्यानंतर खोलपुरी गेट येथील महापालिकेच्या रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्यांचा स्वॅब घेतला आणि घरी जायला सांगितले. यावेळी कुटुंबातील काही सदस्यांनी त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालतात दाखल करण्याबाबत पत्र द्या अशी मागणी केली होती. मात्र तशी गरज नसल्याचे सांगण्यात आले. आज सदर व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट होताच गत काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.