अमरावती - कोरोनाग्रस्त माजी वन राज्यमंत्र्यांना पुढील उपचारासाठी आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. त्यांच्या संपर्कातील अनेकांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्त माजी राज्यमंत्र्यांना नागपूरला हलविले; संपर्कातील अनेक विलगीकरणात - अमरावती कोरोना
कोरोना चाचणी अहवालात लागण झाल्याचे स्पष्ट होताच, सोमवारी रात्री त्यांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
माजी वन राज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच अमरावतीत खळबळ उडाली आहे. कोरोना चाचणी अहवालात लागण झाल्याचे स्पष्ट होताच, सोमवारी रात्री त्यांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी आपल्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात यावे, अशी विनंती केल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे.
दरम्यान, माजी वन राज्यमंत्र्यांचा लोकसंपर्क दांडगा असून लॉकडाऊनच्या काळातही त्यांचा जनसंपर्क कायम असल्याची माहिती आहे. यामुळे गत काही दिवसांपासून त्यांच्या सतत संपर्कात असणाऱ्या शहरातील विविध भागांतील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.