अमरावती-जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा स्वीय सहायक, सर्व शिक्षा अभियानामधील कर्मचारी तसेच पाणी पुरवठा विभागातील चालकास कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 750 वर पोचली आहे.
जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षा अभियानात कार्यरत कर्मचारी गत काही दिवसांपासून कोरोना कक्षात कार्यरत होता. त्याला कोरोनाची लागण झल्याचे स्पष्ट होताच, तो बसत असणाऱ्या कक्षासह परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात शुकशुकाट पसरला होता
बुधवारी अमरावती शहर आणि जिल्ह्यात एकूण 25 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.भीमनगर परिसरात 44 व 70 वर्षीय दोन पुरुषांसह 7 वर्षाच्या बालिकेला कोरोना झाला आहे. श्रीकृष्णपेठ येथे 23 वर्षीय युवक कोरोनाबधित असून महेंद्र कॉलनी परिसरात 57 वर्षीय महिला, अनुपनगर येथे 29 वर्षीय पुरुष, कांतानगर येथे 35 वर्षीय महिला, रामपुरी कॅम्प परिसरात 6 वर्षीय बालिकेसह 29 आणि 37 वर्षीय दोन महिला, कॅम्प परिसरात 56 आणि 28 वर्षीय पुरुष, अशोक नगर परिसरात 55 वर्षीय महिला यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.