अमरावती -कोरोनाग्रस्तांचा आकडा आज 24 वर गेला आहे. रविवारी नांदुरा-पिंगळाई या गावातील मूळ रहिवासी आणि सध्या अमरावतीच्या खोलपुरी गेट परिसरात वास्तव्यास असणाऱ्या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या पत्नीलाही कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोलपुरी गेट परिसरात आणखी एक 20 वर्षीय युवक कोरोनाबाधित आल्याने आता अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 25 झाली आहे.
नांदुरा पिंगळाई येथील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या पत्नीलाही कोरोना, अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या 25 - News about corona virus
अमरावती जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 झाला आहे. रविवारी नांदुर-पिंगळाई गावातील मूळ रहिवासी आणि सध्या अमरावतीच्या खोलपुरी गेट परिसरातील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
आज अमरावतीचे 36 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी दोघे कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आहे. रविवारी नांदुरा पिंगळाई येथील मूळ रहिवासी असणाऱ्या व्यक्तीला कोरोना असल्याचे समोर आले होते. तो व्यक्ती काही वर्षांपासून पठाणचौक परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या खोलपुरी गेट परिसरात राहत होता. रविवारला त्याला कोरोना असल्याचे समोर आल्यावर आज त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खोलपुरी गेट परिसरात एका 20 वर्षीय युवकाला सुद्धा कोरोना असल्याचे सिद्ध होताच परिसरात खळबळ उडाली आहे. अमरावतीत आता कोरोना रुग्णांची सांख्य 25 झाली असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.