अमरावती -मागीलवर्षी होळीनंतर कोरोनाने थैमान घातले होते. यावर्षीची होळी कोरोनाच्या सावटातच साजरी होत आहे. रंगांचा सण असणाऱ्या होळीला गाठीचे महत्वही अनन्यसाधारण आहे. असे असले तरी यावर्षी गाठीचा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे बहरला नसून होळीची परंपरा म्हणून ग्राहक नावापुरती गाठी खरेदी करीत आल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
१०० किलोच्या जागी ५० किलोच्या गाठ्या
'होळी सण जवळ येताच आम्ही गाठी बनवायला सुरुवात करतो. दरवर्षी १०० किलो गाठ्या आम्ही तयार करून विकत असतो. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे तसेच सायंकाळी बाजारपेठ बंद होते. त्यामुळे यावर्षी केवळ ५० किलो गाठी तयार कराव्या लागल्या.' अशी भावना गाठी व्यावसायिकांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली आहे.
उत्तरप्रदेशातील कारागीर