अमरावती -घरातील स्वयंपाक करणं हे महिलांचं रोजचं कामच आहे, पोळ्या करणं हा तसा प्रत्येक महिलेच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. परंतु तीच महिला जर राजकारणात असेल, तर असा निवांत वेळ काढणे शक्य नसते. मात्र अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत पोळ्या लाटल्या आहेत, एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पोळ्या लाटल्याचे पाहायला मिळाले.
...आणि यशोमती ठाकूर यांनी लाटल्या पोळ्या - Yashomati Thakur Latest News Amravati
घरातील स्वयंपाक करणं हे महिलांचं रोजचं कामच आहे, पोळ्या करणं हा तसा प्रत्येक महिलेच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. परंतु तीच महिला जर राजकारणात असेल, तर असा निवांत वेळ काढणे शक्य नसते. मात्र अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत पोळ्या लाटल्या आहेत, एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पोळ्या लाटल्याचे पाहायला मिळाले.
... आणि यशोमती ठाकूर यांनी पोळ्या लाटल्या
अमरावती जिल्ह्यातील विकास कामांचे भूमिपूजन करण्याचा सपाटा सध्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी लावला आहे. अशातच आज त्यांच्या तिवसा मतदाससंघातील शेंदूरजाना बाजार येथील एका कार्यकर्त्याच्या घरी कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे आमंत्रण यशोमती ठाकूर यांना देण्यात आले होते. म्हणून यशोमती ठाकूर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमस्थळी काही महिला पोळ्या लाटत होत्या, त्यांना पाहून यशोमती ठाकून यांनी देखील हातात लाटन घेऊन चक्क पोळ्या लाटल्या. खुद्द मंत्रीच पोळ्या लाटत असल्याने महिला देखील त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होत्या. दरम्यान आज वेळात वेळ काढून मला माझ्या भगिनींसोबत पोळ्या लाटण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिली.