अमरावती - लॉकडाऊनच्या दरम्यान कृषी उत्पन्न समित्या काही काळ बंद राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यातच पिकांना भाव नसल्याने आर्थिक पातळीवर आणखी घसरण झाली. अद्याप लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यातच कापूस विकायला गेलेल्या शेतकऱ्याला जिनिग प्रेसिंगमधील एका कर्मचाऱ्याने चार हजारांची लाच मागितल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मोर्शी तालुक्यातील या प्रकरणात लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी फेसबुकवर शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. पेरणीचा हंगाम आटोपून एक महिना झाला आहे. त्यात सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असताना देखील जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरी अद्यापही लाखो क्विंटल कापूस घरी पडून आहे. त्यामुळे शेतीतील खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशातच ज्या शेतकऱ्याचा नंबर शासकीय कापूस खरेदीमध्ये लागला आहे. त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. कापूस विक्रीसाठी नेल्यानंतर खराब असल्याचे कारण देत शेतकऱ्यांना लाच द्यावी लागतीय.
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्याकडे मागितली लाच; बाजार समितीतील प्रकाराचे 'रेकॉर्डिंग'
कापूस विकायला नेलेल्या शेतकऱ्याला जिनिग प्रेसिंगमधील एका कर्मचाऱ्याने चार हजारांची लाच मागितल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मोर्शी तालुक्यातील या प्रकरणात लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी फेसबुकवर शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वीच वरुड तालुक्यातील एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला होता. त्यानंतर आता मोर्शी तालुक्यातील ऋषिकेश शहाने या शेतकऱ्यांने जलालखेडा येथे कापूस विक्रीसाठी आणला होता. त्यात थोडा कापूस खराब असल्याने खरेदी करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना घडली आहे.
संबंधित घटनेचा व्हिडिओ अनिल बोंडे यांनी फेसबुकवर शेअर केला असून या प्रकरणानंतर देखील मुख्यमंत्री कारवाई करणार की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणांनंतर मुख्यमंत्री कारवाई करणार की नाही असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.