महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन - अॅड. यशोमती ठाकूर यांच्या बद्दल बातमी

हुतात्मा सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन करण्यात आले.यावेळी कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे राहू, असेही पाकमंत्री म्हणाल्या.

Consolation from the Guardian Minister to the families of the martyred CRPF jawan Mukund Thackeray
शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

By

Published : Jun 21, 2021, 12:14 PM IST

अमरावती - हुतात्मा सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज पिंपळविहिर येथे केले. पिंपळविहीर येथील सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे हे नक्षलग्रस्त भागात कार्यरत होते. शहीद ठाकरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले.

शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

ठाकरे कुटूंबातील सदस्यांशी संवाद साधून केले सांत्वन -

शहीद ठाकरे हे छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात कार्यरत होते. त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे राहू. या कुटुंबाला शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल, असे पालकमंत्री अॅड. ठाकूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे कुटूंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details