महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने - अमरावती ताज्या बातम्या

युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्यावतीने सोमवारी इंधन दरवाढीविरोधात शहरातील इर्विन चौक येथील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर निदर्शन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

Congress protests against fuel price hike in amravati
अमरावती : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

By

Published : Jun 7, 2021, 10:27 PM IST

अमरावती -इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्यावतीने सोमवारी शहरातील इर्विन चौक येथील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर निदर्शन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

प्रतिक्रिया

'जनतेला लोटले महागाईच्या खाईत' -

केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोल 100 रुपये लीटरवर पोचले आहे, तर डिझेलचे दर 92 रुपये लीटरवर गेले आहे. स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलिंडर 900 रुपये झाले आहे. केंद्र शासनाने या दरवाडीद्वारे लाखो-कोटी रुपयांचा नफा कमवला असताना सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यानी केला.

पोलिसांचा होता बंदोबस्त -

इर्विन चौक येथील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर काँग्रेसचे आंदोलन असल्याने याठिकाणी पोलीस बंदोबस्त आधीच तैनात होता. पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

हेही वाचा - टीएमसीचा देशभर विस्तार करत भाजपाचा करणार पराभव - अभिषेक बॅनर्जी

ABOUT THE AUTHOR

...view details