अमरावती -गुरुवारी राज्यभरात अनेक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज दाखल करताना या नेत्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही तिवसा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकूर यांनी त्यांचे दिवंगत वडील माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्याबद्दल विचारले तेव्हा आक्रमक असलेल्या यशोमती ठाकुर गहिवरल्या.
...म्हणून आक्रमक असलेल्या आमदार यशोमती ठाकूर गहिवरल्या
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही तिवसा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकूर यांनी त्यांचे दिवंगत वडील माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्याबद्दल विचारले तेव्हा आक्रमक असलेल्या यशोमती ठाकुर गहिवरल्या.
यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, ईटीव्ही भारतशी बोलताना ठाकूर म्हणाल्या, की आमच्या वडिलांनी मार्ग शिकवला म्हणून आम्ही शिकलो. त्यांनी आम्हाला सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यांनी आम्हाला राष्ट्रसंत समजून सांगितले. आज भैय्यासाहेब नाहीत, त्यांच्या अनुपस्थितीतील पहिल्या निवडणुकीला सामोरे जात आहे. आज त्यांची उणीव भासते ते माझे वडीलच नव्हते तर ते माझे गुरूही होते. त्यांनी दिलेली शिकवणं आजही आमच्यासोबत आहे. असे म्हणत वडिलांच्या आठवणीला उजाळा देत आक्रमक असणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर गहिवरल्या.
बहीण संयोगीता निंबाळकर यांना माफ केलं
महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच कुटुंबातील व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणूक लढवणे हे नवीन नाही. अशातच 2014 मध्ये यशोमती ठाकूर यांच्या विरोधात त्यांच्या सख्या बहीण संयोगीता निंबाळकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे तिवसा मतदारसंघ हा राज्यभर गाजला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार यशोमती ठाकूर यांना विचारले असता त्या म्हणाल्या कुठलीही दुष्मनी ही कायमस्वरूपी नसते. कुणाचा द्वेष हा करायचा नसतो. ती शिकवन आम्हला तुकडोजी महाराज यांनी दिली आहे. म्हणून चुकलेल्यांना माफ करुन पुढे जायचं असते.