महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राध्यापकांचे निलंबन मागे घ्या' - oath against love marriage

काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या प्राचार्य निलंबन प्रकरणावर विधानसभेत भाष्य केले. संबंधित कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

amravati students news
काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या प्राचार्य निलंबन प्रकरणावर विधानसभेत भाष्य केले.

By

Published : Feb 28, 2020, 5:41 PM IST

अमरावती - चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यांचे निलंबन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी कालपासून ठिय्या आंदोलन करत कॉलेजच्या तासिकांना अनुपस्थिती लावली. यानंतर आता काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांनी संबंधित प्रकरणावर भाष्य केले आहे. ही शपथ विद्यार्थीनींनी उस्फुर्तपणे घेतली असून प्राध्यापकांचे झालेले निलंबन हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले.

काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या प्राचार्य निलंबन प्रकरणावर विधानसभेत भाष्य केले.

13 फेब्रुवारीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरात महाविद्यालयीन विद्यार्थीनींना प्रेम तसेच प्रेमविवाह न करण्यासंबंधी शपथ देण्यात आली होती. यानंतर राज्यभरातून या प्रकरणाचे पडसाद उमटले. गुरुवारी (27फेब्रुवारी) प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रदीप दंदे व रासेयो कार्यक्रम अधिकारी विजय कापसे यांना निलंबीत करण्यात आले होते.

हेही वाचा -'त्या' विद्यार्थिनीचा मृत्यू शिक्षकामुळेच, परीक्षा चुकवण्यासाठी सुचवला 'भयंकर उपाय'..

ABOUT THE AUTHOR

...view details