महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dilip Yedatkar Criticize Navneet Rana : मतदारांची फसवणूक करणाऱ्या खासदारांनी काँग्रेस विरोधात बोलूच नये : काँग्रेस नेते दिलीप एडतकर - Dilip Yedatkar on Navneet Rana

पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) बिनबुडाचे आरोप करीत आहेत. फसवणूक करणे हीच प्रवृत्ती असणाऱ्या खासदार नवनीत राणांनी काँग्रेस विरोधात एक शब्दही बोलू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर ( Congress Leadr Dilip Yedatkar ) यांनी म्हटले आहे. ( Congress Leadr Dilip Yedatkar Criticize Navneet Rana )

Congress Leader Dilip Yedatkar Criticize MP Navneet Rana Amravati
काँग्रेस नेते दिलीप एडतकर खासदार नवनीत राणा

By

Published : Feb 16, 2022, 7:11 PM IST

Updated : Feb 16, 2022, 11:21 PM IST

अमरावती -लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतं मागून निवडून आल्यावर भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांसोबतच जिल्ह्यातील दलित, मुस्लिम, ओबीसी या त्यांच्या मतदारांचीही फसवणूक केली आहे. आता आमच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप त्या करीत आहेत. फसवणूक करणे हीच प्रवृत्ती असणाऱ्या खासदार नवनीत राणांनी काँग्रेस विरोधात एक शब्दही बोलू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर ( Congress Leadr Dilip Yedatkar ) यांनी म्हटले आहे. ( Congress Leadr Dilip Yedatkar Criticize Navneet Rana )

काँग्रेस नेते दिलीप एडतकर यांची प्रतिक्रिया

पुतळ्यासाठी परवानगी लागते हे खासदारांना माहित नाही का -

आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरासारखा मध्यरात्री राजापेठ उड्डाणपुलावर बसवला. अनाधिकृतपणे बसलेला पुतळा महापालिका प्रशासनाने काढल्यावर महापालिका प्रशासनाविरोधात बंड ठोकणे योग्य नाही. खरंतर देशाच्या वरिष्ठ सभागृहात कायदा बनविण्याची जबाबदारी असणाऱ्या खासदारांना पुतळा बसविण्यासाठी परवानगी लागते याबाबत खासदारांना माहिती नसते, याबाबतही दिलीप एडतकर यांनी शंका उपस्थित केली.

नवनीत राणांनी मेळघाटात कोणती मदत केली -

जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात ईडीची चौकशी लावण्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला. यशोमती ठाकूर यांचे काम सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्याविरोधात राणा कुठलाही पुरावा सादर करू शकत नाही. यामुळे पालक 15 विरोधात ईडी, सीबीआय कुठलीही चौकशी लावा किंवा हा प्रश्न थेट युनोमध्ये घेऊन जा काहीच फरक पडणार नाही. मात्र, त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे बंद करावे. खासदार नवनीत राणा यांनी आतापर्यंत मेळघाटात नेमकी कोणती मदत केली, असे जाहीर करावे असेही दिलीप एडतकर म्हणाले.

हेही वाचा -Municipal Commissioner Ink Thrown Case : राजापेठ उड्डाणपूल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, आमदार राणा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची तयारी

आमदार राणा का पळाले -

आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले. आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यातील कायद्यांबाबत खासदार नवनीत राणा कधीही बोलल्या नाही. पोलीस आयुक्तांचे काम चोख असून रवी राणा यांनी कुठलीही चूक केली नाही तर मग ते अमरावतीतून का पळाले असा सवाल देखील दिलीप एडतकर यांनी उपस्थित केला.

Last Updated : Feb 16, 2022, 11:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details