महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोणी म्हणतं परीक्षा हवी, कोणी म्हणतं परीक्षा नकोच...

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि एसएनडीटी विद्यापीठ मुंबई या चार विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती नेमून परीक्षा घेण्यासंदर्भात अहवाल मागितला होता. कुलगुरूंच्या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य शासनाने विद्यपीठांची परीक्षा होणार नाही असे जाहीर केले होते.

confusion-over-university-exams-in-amravti
कोणी म्हणतं परीक्षा हवी, कोणी म्हणतं परीक्षा नकोच...

By

Published : Jul 8, 2020, 2:51 PM IST

अमरावती- कोरोनाच्या संकट काळात परीक्षा कशा घेता येतील हे विद्यापीठाने ठरवावे असे विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यपीठांना एप्रिल महिन्यात सूचित केले होते. राज्यातील परिस्थिती पाहता विद्यापीठाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला होता. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर अखेरपर्यंत अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यापीठांनी घ्याव्या असे स्पष्ट केले आहे. एकूणच विद्यापीठांच्या परिक्षेसंदर्भात पेच निर्माण झाला असताना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या काही सिनेट सदस्यांनी परीक्षा हवी तर काहींनी नको, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसोबतच विद्यापीठ प्रशासनालाही कठीण अशा परीक्षेला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोणी म्हणतं परीक्षा हवी, कोणी म्हणतं परीक्षा नकोच...

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 4 सत्र परीक्षा द्याव्या लागतात. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी 6 सत्र परीक्षा असून 5 वर्षाच्या अभ्यासक्रमाला 10 सत्र परीक्षा द्याव्या लागतात. यावर्षी ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा कशा घेता येतील याबाबत विद्यापीठांनी निर्णय घ्यावा असे जाहीर केले होते.

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि एसएनडीटी विद्यापीठ मुंबई या चार विद्यपीठांच्या कुलगुरूंची समिती नेमून परीक्षा घेण्यासंदर्भात अहवाल मागितला होता. कुलगुरूंच्या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य शासनाने विद्यपीठांची परीक्षा होणार नाही असे जाहीर केले होते. शासनाच्या या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना पूर्वीच्या सत्रात मिळालेले गुण तसेच अंतर्गत गुण मिळून अंतिम सत्राच्या परीक्षेचा निकाल ग्रेड नुसार देण्याचे ठरले.

विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या सत्राच्या सर्व गुणपत्रिकांची झेरॉक्स प्रत मागविली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना आधीच्या सत्रात मिळालेल्या गुणांनुसार ग्रेड देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने आता सप्टेंबर अखेरपर्यंत अंतिम सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करताच परीक्षा विभाग आणि विद्यपीठ संलग्नित महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या सत्राच्या गुणपत्रिका मिळविण्यासाठीचा खटाटोप व्यर्थ ठरणार आहे. विद्यपीठ अनुदान आयोगाच्या नव्या मार्गदर्शत्त्वानुसार सर्व शाखेच्या अंतिम सत्राची परीक्षा घेतली तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यातून एकूण 66 हजार 800 विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे.


संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाचे परीक्षा मूल्यांकन संचालक डॉ. हेमंत देशमुख या संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याची तयारी विद्यपीठाने पूर्ण केली आहे. आता विद्यपीठ अनुदान आयोगाचे नव्याने मार्गदर्शनतत्व विद्यपीठाला प्राप्त झाले आहे. शासनाचे आदेश आणि विद्यपीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही परीक्षा घेण्यास तयार आहोत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर साडेतीन महिन्यांपासून विद्यपीठात नाहीत. त्यांच्याकडे नागपूर विद्यापिठाचा प्रभार येताच त्यांनी त्यांचे मूळपद असणाऱ्या अमरावती विद्यापीठाकडे चक्क पाठ फिरवली असल्याने परिक्षेसारख्या महत्वाच्या विषयात निर्णय घेणारे प्रमुखच विद्यापिठात नसल्याबाबत 'नुटा' नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशचे अध्यक्ष आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना खंत व्यक्त केली.

परिक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासन दोन टोकाच्या भूमिका मांडत आहे. अशा संभ्रमच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य सूचना देणारे कुलगुरू जागेवर नाहीत हे दुर्दैव असल्याचे प्रा.डॉ.प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले.

आता अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांचे ग्रेड प्रमाणे गुणांकन केले जात आहेत. ज्या विद्यार्थाना त्यांच्या पहिल्या काही सत्रात गुण मिळाले त्यानुसार त्यांचे अंतिम सत्राचे गुणांकन करुन ग्रेड दिले जात आहेत. जेव्हा कोरोना अल्प प्रमाणात होतो तेव्हा परीक्षा घेऊ नका असे संगीलले गेले. आता कोरोना सर्वत्र वाढला असताना परीक्षा घेण्यास सांगणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे डोके फिरले असल्याचा आरोप प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी केला.


विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला तर या परीक्षा होणे विद्यार्थी हिताचे असल्याचे आखील भारतीय विद्यार्थी संघनटनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेशवर खूपसे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाव्यात ही अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेची पूर्वीपासून मागणी होती. आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनातला संभ्रम दूर झाला आहे. आता परीक्षा होणार असून हे विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे ज्ञानेश्वर खूपसे यांनी सांगितले.


दरम्यान राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियल यांना 7 जुलैला पाठविलेल्या पत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 6 जुलैच्या सूचना या बंधनकारक नसून केवळ मार्गदर्शक स्वरूपाच्या आहेत, असा उल्लेख असल्यामुळे विद्यपीठांसमोर नेमक्या कोणाच्या सूचना मान्य करायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आशा बिकट परिस्थितीत विद्यपीठात अनुपस्थित असणे अत्यंत दुर्दैवी आहे. एकूण अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हा खरं तर विद्यापीठासमोर मोठा पेच आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अंतिम सत्रातील शाखा निहाय विद्यार्थी संख्या...
एमएसी 3 हजार विद्यार्थी, बीएससी 12 हजार 882, बीसीए 1 हजार 42, बी इ आणि एम ई 8 हजार 200,
बी फार्म 800, एम.कॉम 2000, बी.कॉम 22 हजार, एमबीए 500, बीबीए 400, एम.ए 2000, बीए 21 हजार 476, एलएलबी 400, बी. एड 1300, बीएमडब्ल्यू 400 आणि एमएसडब्ल्यूचे 400 विद्यार्थी.








ABOUT THE AUTHOR

...view details