अमरावती : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेल्या नांदगाव पेठ टोल नाक्यावर नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधील काही तरुणांनी टोल नाक्यावर गोंधळ घातल्याचा प्रकार आज दुपारी समोर आला आहे. जलदगती मार्गाच्या रांगेतून वाहन लावण्यावरून हा गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्यावर तरुणांचा गोंधळ - अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6
नांदगाव पेठ टोल नाक्यावर नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधील काही तरुणांनी टोल नाक्यावर गोंधळ घातल्याचा प्रकार आज दुपारी समोर आला आहे. जलदगती मार्गाच्या रांगेतून वाहन लावण्यावरून हा गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स ही नांदगाव पेठ पथकर नाक्यावर आली. याच दरम्यान या नाक्यावर एक ट्रक होता तो ट्रक कुठल्या 'लेन'मधून टाकायचा हे चालकाला सुचत नव्हते. यादरम्यान काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्याच रागाच्या भरातून ट्रॅव्हल्समधील तरुणांनी खाली उतरून नाक्यावर धुडगूस घातला. तर काही तरुणांनी अक्षरशः टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात मारहाणीचा देखील प्रयत्न केला. या ठिकाणी सुमारे 15 मिनिटे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे टोल नाक्यावर गोंधळ उडाला होता.