महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यापीठ-महाविद्यालयात शैक्षणिक सत्राला सुरुवात, विद्यार्थ्यांचा उत्साह झळकणार दिवाळीनंतरच - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 2021-22 शैक्षणिक वर्षाचे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले असताना अमरावती शहर आणि जिल्ह्यात सर्व महाविद्यालय सज्ज झाले आहेत. मात्र, आज (दि. 20) पहिल्याच दिवशी विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी फिरकलेच नाही. दिवाळीनंतर मात्र ऑफलाइन शैक्षणिक सत्राला खऱ्या अर्थाने जोमाने प्रारंभ होईल आणि विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयात आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अमरावती
अमरावती

By

Published : Oct 20, 2021, 8:25 PM IST

अमरावती -महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 2021-22 शैक्षणिक वर्षाचे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले असताना अमरावती शहर आणि जिल्ह्यात सर्व महाविद्यालय सज्ज झाले आहेत. मात्र, आज (दि. 20) पहिल्याच दिवशी विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी फिरकलेच नाही. दिवाळीनंतर मात्र ऑफलाइन शैक्षणिक सत्राला खऱ्या अर्थाने जोमाने प्रारंभ होईल आणि विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयात आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यापीठ-महाविद्यालयात शैक्षणिक सत्राला सुरुवात

विद्यापीठाची तयारी पूर्ण, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यापीठातील सर्व शिक्षण विभाग आजपासून ऑफलाइन अभ्यासक्रमासाठी खुले केले आहेत. यासह विद्यापीठाशी संलग्नित अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातील प्राचार्यांनी आजपासून ऑफलाइन शिक्षण देण्याची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही अमरावती शहरापेक्षा विभागातील पाचही जिल्ह्याच्या विविध भागात अधिक आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना अमरावतीत येणे तसेच राहण्याची व्यवस्था करणे या अडचणी निश्चितच आल्या असणार. मात्र, विद्यापीठाने विद्यापीठातील सर्व वसतीगृह विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सज्ज ठेवले आहे, हळूहळू विद्यार्थी येतील. आता दिवाळीही आहे. दिवाळीनंतर विद्यापीठासह सर्वच महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गजबज पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांनाही महाविद्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली असून महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठात ऑफलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी प्रतिसाद देतील, असा विश्वास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केला.

विद्यापीठ व महाविद्यालयात दिली जाणार दुसरी लस

अठरा वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. पण, दुसरी लस घेणे बाकी आहे अशा विद्यार्थ्यांना कोरोनाची दुसरी लस देण्याची व्यवस्था विद्यापीठासह विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयात केली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी सांगितले. विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण विभागासह सर्वच महाविद्यालयात केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांनाच ऑफलाइन शिक्षण दिले जाणार असून उर्वरित पन्नास टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीनेच सुरू राहणार असल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी विद्यापीठातील सर्वच विभागात प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. प्रवेशासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनात विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून विविध शाखेचा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात प्रवेश मिळावा. यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने आज विद्यापीठात आले होते.

हेही वाचा -आरोग्य विभागाच्या पदभरतीवरून राज्यमंत्री बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर

ABOUT THE AUTHOR

...view details