अमरावतीCoin On Punjabrao Deshmukh:१२५ व्या जयंतीनिमित्त १२५ रुपयांचे नाणे जारी होणे हा भाऊसाहेब देशमुख आणि त्यांच्या कार्याचा सन्मान असून ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आणि भूषणावह असल्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी म्हटले आहे. (Shivaji Shikshan Sanstha Amravati) कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे काम श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी केले. येत्या २७ डिसेंबर रोजी त्यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने भाऊसाहेबांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 125 रुपयाचे नाणे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना करणारे राजपत्र 21 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Dr Punjabrao Deshmukh Jayanti)
देशमुखांचा घटना समितीतही सहभाग:कृषी, शिक्षण यासह विविध क्षेत्रात डॉ. देशमुख यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी कायमच लढा दिला आहे. तर त्यांचा घटना समितीमधील सहभागसुद्धा उल्लेखनीय आहे. त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन सरकारने अशा पद्धतीचं नाणं जारी करावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा केल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी यावेळी दिली.
भाऊसाहेबांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी:डॉ. पंजाबराब उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी ११ डिसेंबर १९५९ ते २७ फेब्रुवारी १९६० या काळात ८२ दिवसांचं कृषी प्रदर्शन १०० एकर जागेत भरविलं होतं. तसं प्रदर्शन भारतात आजपर्यंत झालेलं नाही. त्याची स्मृती म्हणून अमरावती येथे २७ ते ३० डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविण्यात येत आहे. ७० एकरावर कृषी प्रदर्शन होणार असून त्याचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे करणार असल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख दिली.