अमरावती: अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदान (Code Conduct applicable) आणि 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. (Amravati Graduate Constituency Election) निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 5 जानेवारी 2023 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. 12 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. (Constituency Election) 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. (Election Commissions) 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येईल.
या निवडणुकीच्या आदर्श आचार संहिता कालावधीमध्ये निवडणुक प्रचारार्थ कार्यासाठी किंवा निवडणुकीशी संबंधीत दौऱ्यासाठी मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज संस्थांचे पदाधिकारी, राजकिय पक्षाचे उमेदवार, इत्यादी व्यक्तींना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.