महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी मला भाजपात येण्यासाठी ऑफर देऊ केली - यशोमती ठाकूर - CM

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून, तुम्हाला एवढे-एवढे देतो भाजपत या, अशी ऑफर दिली होती. मात्र, ती ऑफर आपण नाकारली', असा गौप्यस्फोट आमदार यशोमती ठाकूर यांनी केला.

आमदार यशोमती ठाकूर

By

Published : Apr 2, 2019, 7:28 PM IST

अमरावती- 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून, तुम्हाला एवढे-एवढे देतो भाजपात या, अशी ऑफर दिली होती. मात्र, ती ऑफर आपण नाकारली', असा गौप्यस्फोट अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केला.

सभेत बोलताना आमदार यशोमती ठाकूर

अमरावती मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिवसा येथील जयश्री वानखडे सभागृहात सोमवारी रात्री सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला. पैशासाठी राजकारण करत नसून विचारधारेला महत्त्व देत असल्याचे त्यांनी यावेली स्पष्ट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या विचारधारेवर चालत असल्याचे त्या म्हणाल्या.

आमदार रवी राणांसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष हा थोर महापुरुषांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे जातीवादी भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम करीत आहे. मोदी सरकार फेकणारे सरकार आहे, खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आले. मात्र, त्यांनी लोकांची दिशाभूल केली, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. मोदी लाट ओसरली असून वर्ध्याच्या मोदी यांच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. मी आघाडी धर्म पाळणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांना विजयी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना केले

नवनीत राणा काय बोलल्या...

शेतकरी बजेट व्हायला पाहिजे, युवकांना रोजगार मिळायला हवा. खासदार आनंदराव अडसूळ स्वतःला मतदान करू शकत नाही, ते काय अमरावती जिल्हाचा विकास करणार? असा टोला त्यांनी आनंदराव अडसूळ यांना लगावला. अडसूळ माजी खासदार झाले आहेत. त्यामुळे अडसूळ यांनी मला आशिर्वाद द्यावा. निवडणुकीपुरते खासदार जिल्हात असतात. बाकी दिवस गायब असतात, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details